आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या जुळ्या मुलींचा झाला होता मृत्यू, चेटूक करत असल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताेरपा (झारखंड) : ५ दिवसांत दुसऱ्या जुळ्या मुलींचा मृत्यू झाल्यानंतर त्या महिलेने शेजारणीला चेटकीण असल्याचा आरोप करत जिवंत जाळले. ही घटना तोरपा पोलिस ठाणे हद्दीतील तपकारा येथील आहे.
अनिता सोय (२७) ला १५ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुली झाल्या होत्या. याआधी तिला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले आहेत. तीन डिसेंबर रोजी जुळ्या मुलीपैकी एका मुलीस रक्ताच्या उलट्या होत असल्याने तिचा मृत्यू झाला.
दवाखाना या गावापासून ९ किमी दूर असल्याने उपचारासाठी तिला नेण्यात आले नाही. पाच दिवसांनंतर गुरुवारच्या रात्री दुसऱ्या मुलीचेही निधन झाले. यामुळे अनिताच्या मनात पक्का संशय निर्माण झाला की, शेजारीच राहणाऱ्या सुसारी बुरू(६०)ही चेटकीण असून तिनेच तंत्र-मंत्र करून दोन्ही मुलींना ठार मारले.
या संशयामुळेच दुसऱ्या दिवशी सकाळी ती रॉकेलची कॅन घेऊन घरातून बाहेर पडली आणि सुसारीच्या घरी गेली. लाथ मारून तिने दरवाजा तोडला. सुसारी पळून जात असतानाच तिच्यावर रॉकेल टाकून पेटवले. यामुळे घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अनिता सोयला अटक केली.
चेटूक करण्याच्या संशयावरून ऑक्टोबरमध्ये दुहेरी खून
जिल्ह्यातील अडकी ठाणे हद्दीतील लुपुंगडिह गावात ऑक्टोबरमध्ये चेटूक करण्याच्या संशयावरून एका दांपत्याची हत्या करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...