आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे कर्मचाऱ्याच्या शरीरात मिळाल्या 75 टाचण्या, एक्स-रे पाहून डॉक्टर चकित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्णाच्या शरीराच्या भागांत ७५ ऑलपिन आढळल्या. - Divya Marathi
रुग्णाच्या शरीराच्या भागांत ७५ ऑलपिन आढळल्या.
कोटा  - कोटा रेल्वे रुग्णालयामधून रेफर केलेल्या रुग्णासंबंधी रेल्वेचे सर्वात मोठे रुग्णालय मुंबईचे जगजीवन राम हॉस्पिटल (जेआरएच) हादरले आहे. या रुग्ण रेल्वे कर्मचाऱ्याचा एक्स-रे पाहून जेआरएचचे सर्व वरिष्ठ डॉक्टर त्रस्त आहेत. वास्तविक या रुग्णाच्या शरीराच्या भागांत ७५ ऑलपिन आढळल्या. गळा, हात, पायासह इतर भागांत या पिन गेल्या कशा? हे डॉक्टर समजू शकले ना रुग्ण. सध्या त्याच्यावर शस्त्रक्रियेची तयारी सुरू आहे.  

कोटा रेल्वे परिमंडळाच्या बुंदी येथील व्हॉल्व्हमॅन बद्रीलाल मीणा (५६) यांना दीड महिन्यापूर्वी एका पायास जखम झाल्याकारणाने कोटा रेल्वे रुग्णालयात आणले. कोटाच्या डॉक्टरांनी जेव्हा त्यांच्या एक्स-रे तपासणी केली तेव्हा त्यात बऱ्याच ऑलपिन दिसल्या. पुन्हा एक्स-रे केला तेव्हा त्यातही हीच स्थिती समोर आली. मग डाॅक्टरांनी त्यांना जेआरएचसाठी रेफर केले. रुग्ण ८ दिवसांपासून जेआरएचमध्ये दाखल आहे. तो बोलु व खाऊ-पिऊ शकत नाहीये.   
 
शस्त्रक्रियेची योजना सुरू, सर्व पिन काढण्याचा प्रयत्न करतील :  जेआरएचचे संचालक डॉ. हेमंतकुमार यांनी सांगितले की, गळ्याच्या पुढील भागात २५ पिना आहेत. इतर भागांतही पिना आढळल्यात. डॉक्टरांच्या टीमने त्या मोजल्या. जवळपास ७५ पिना असल्याचे समोर आले आहे. रुग्णाला मधुमेह आहे आणि त्याची साखर पातळी नियंत्रणात येत आहे. आम्ही त्याला प्रतिजैवके देत आहोत. पूर्वीपेक्षा त्याच्या शरीराच्या वेदना व सूज कमी झाली आहे. मला वाटते की, हा रोगी कोणत्यातरी सायकियाट्रिक डिसऑर्डरचा बळी झालेला आहे.  
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा एक्स-रे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...