आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबिनमध्ये बोलावून छेड काढणाऱ्या प्राचार्याचे विद्यार्थींनींनी भर बाजारात उतरवले कपडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत (हरियाणा) - येथील फतेहाबादच्या भूना गावात विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्या प्राचार्याला विद्यार्थिनींनी भर बाजारात चोप दिला. तेथील बघ्यांनीही त्याच्यावर हात साफ करुन घेतला. विद्यार्थिनींनी प्राचार्याची गावातून अर्धनग्न धिंड काढली. प्राचार्यावर आरोप आहे, की त्याने विद्यार्थीनींना फीस माफ करण्याचे अमिष दाखवून त्यांच्यासोबत शारीरिक सलगी करण्याचा प्रयत्न केला. कित्येक दिवसांपासून प्राचार्य विद्यार्थीनींना असा सतावत होता. पोलिसांनी मुलींच्या तक्रारीवरुन प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थीनीच्या वडिलांनी लावला ट्रॅप
सरस्वती महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीने सांगितले, प्राचार्य राजकुमार अनेक दिवसांपासून दोन मुलींना आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेत होता आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव ठेवत होता. त्याने गुरुवारी देखील दोन विद्यार्थीनींना बोलावून घेतले आणि त्याचा कार्यक्रम सुरु केला. विद्यार्थीनीचे म्हणणे आहे, की शारीरिक संबंधाच्या बदल्यात फीस माफ करेल, असे तो म्हणत होता. त्यातील एका विद्यार्थीनीने ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांना सांगितली. तिच्या वडिलांनी तिला रात्रीच प्राचार्याला मिस कॉल देण्यास सांगितले. विद्यार्थीनीचा मिस कॉल येताच प्राचार्याने तिला फोन केला. विद्यार्थीनीने प्राचार्याला तुम्ही म्हणाल तसे करायला मी तयार आहे, फक्त त्याचा बोभाटा होणार नाही ते पाहा, असे सांगितले. फोनवर ठरल्याप्रमाणे ती सकाळी 10 वाजता त्याच्या कॅबिनमध्ये गेली.
प्राचार्याला रंगेहात पकडले
ठरलेल्या प्लॅननुसार विद्यार्थीनी शुक्रवार सकाळी 10 वाजता प्राचार्याच्या कॅबिनमध्ये पोहोचल्या. दोन्ही मुलींचे कुटुंबीय देखील महाविद्यालयात आले होते. मुली कॅबिनमध्ये गेल्यानंतर थोड्याच वेळात ते देखील तिथे पोहोचले आणि अश्लिल चाळे करणाऱ्या प्राचार्याला रंगेहात पकडले. त्यांनी त्याला तिथेच मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलांनी त्याला कॅबिनबाहेर ओढले आणि सर्वांसमोर बेदम चोप दिला. मारत मारतच त्याला रस्त्यावर आणले आणि भर बाजारात त्याचे कपडे उतरवले.