आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुवर्णमंदिर सर्वाधिक भाविकांच्या भेटीचे स्थळ; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड््स यूकेने दिले प्रमाणपत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड््सनंतर विविध क्षेत्रातील रेकॉर्ड््सची निवड करणारी  दुसरी सर्वात मोठी संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड््स यूकेने अमृतसर येथील सुवर्णमंदिरास जगातील सर्वाधिक भाविकांनी भेट दिलेले धर्मस्थळ (Most visited place) अशी नोंद केली आहे. संस्थेच्या भारत तसेच पंजाबातील प्रतिनिधींनी शुक्रवारी याचे प्रमाणपत्र दिले. गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे मुख्य सचिव डॉ. रूपसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रमाणपत्रांचा स्वीकार केला.


प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस सुरभी कौल, पंजाबचे प्रमुख हरदीप काेहली, गौरवआनंद, कॅ. अभिनव गर्ग, सागर कपूर तसेच मिनी कोहली अमृतसरमध्ये आले होते. कौल यांनी सांगितले, आमची संस्था केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांतील विविध स्थळांचा दरवर्षी सर्व्हे करते. यामध्ये सर्वप्रथम आलेल्या स्थळास प्रमाणपत्र दिले जाते. या वर्षी हा सन्मान सुवर्णमंदिरास मिळाला आहे. कोहली यांनी सांगितले, आमच्या पथकाने तीन महिन्यापूर्वी येथे सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये सुवर्णमंदिराकडे जाणाऱ्या मार्गापासून ते सुवर्णमंदिरातील स्वच्छता, २४ तास सुरू असलेले कीर्तन, व रोज एक लाखाहून अधिक भाविक येथे समानतेने लंगरमध्ये सहभागी असतात.

 

मानवतेच्या सेवेचे उदाहरण

सन्मान स्वीकारल्यानंतर मंदिरात आलेल्या पथकाचा श्री दरबारसाहिब यांची प्रतिकृती, छायाचित्र तसेच सिरोपा देऊन सत्कार करण्यात आला. डाॅ. रूपसिंग यांनी म्हटले, येथील प्रधान किरपालसिंग बडूंगर यांच्या नेतृत्वाखाली या तीर्थस्थळाची निवड करून सन्मानित केले.

बातम्या आणखी आहेत...