आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Gun Shots Fired Outside Omar Abdullahs Residence In Srinagar

जम्मू-काश्मीर : मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या घराबाहेर जवानाकडून फायरिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात एका सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला आहे. बीएसएफच्या या जवानाने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या, यानंतर त्याला अब्दूल्लांच्या निवासस्थान सुरक्षेतून काढून टाकण्यात आले आहे. गोळी झाडणार्‍या या जवानाला अटक करण्यात आली आहे. ज्यावेळी त्याने गोळीबार केला तेव्हा अब्दुल्ला घरात नव्हते. दरम्यान, उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन सांगितले आहे, की त्यांचा त्यांच्या सुरक्षा रक्षकांवर पूर्ण विश्वास आहे.

सोमवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान जवानाने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून चार-पाच गोळ्या झाडण्याचा आवाज आला. आवाज येताच त्याच्यासोबत तैनात असलेले इतर जवान सतर्क झाले आणि त्यांनी त्याला पकडले. या जवानाने फायरिंग का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

(छायाचित्र - उमर अब्दुल्ला यांच्या घराबाहेरचे दृष्य.)