आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थरार: शंख नदीच्या महापूरात अडकला वृद्ध, मग अशी उडाली धांदल- पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खडकावर अडकलेला महाशय.(इंसेटमध्ये) - Divya Marathi
खडकावर अडकलेला महाशय.(इंसेटमध्ये)
लोहरदगा(झारखंड)- येथे सलग सरू असलेल्या पावसामुळे बुधवारी शंख नदीला आलेल्या पूरात एका म्हाताऱ्या व्यक्तीचा जीव तब्बल 15 तास नदीत असलेल्या एका खडकावर आडकला होता. पाऊस सूरू असल्याने लवकर घरी जाण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करणे त्यांना माहागात पडले. ते घरी जाण्यासाठी नदी ओलांडत असतांना अचानक पूर आला आणि ते नदीतच अडकले. त्यांना तेथेच असलेल्या एका खडकावर रात्र काढावी लागली. गुरूवारी सकाळी एका युवकाने त्यांना पाहिले यानंतर मोठ्या मुष्कीलीने त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

- पुरात अडकलेल्या या व्यक्तीचे नाव सुकरा भगत (60) असे आहे. हे पतराटोली येथे टायर पंक्चरचे दुकान चालवतात. ते रात्री 11 वाजता घरी परतत होते.

-घरी लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी नदीतून जाण्याचे ठरवले. मात्र अचानक आलेल्या पुरामूळे ते नदीतच अडकले. सकाळ झाल्यानंतर त्यांच्या ओरडण्याचा आवाज स्थानिकांना आला यानंतर त्यांना पुरातून बाहेर काढण्यात आले.

-यावेळी प्रसंगावधान दाखवत गावातील ईश्वर उरांव (20) या युवकाने धाडस दाखवले आणि तो कमरेला दोर बांधून पोहत त्या खडकापर्यंत गेला. यानंतर साधारणपणे अडीच तासांनी त्या म्हाताऱ्याला पूरातून बाहेर काढण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या युवकाने कसा वाचवला त्या म्हाताऱ्या माणसाचा जीव...
बातम्या आणखी आहेत...