आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP मध्ये गडबड: शिक्षक भरतीत महात्मा गांधी अन् अमिताभ बच्चन यांच्या नावाचे अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन - Divya Marathi
अमिताभ बच्चन
लखनऊ- कायम गोधळासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तरप्रदेशात आता सहायक शिक्षक भरती प्रक्रियेतही सावळा गोंधळ सुरू असलेल्याचे चव्हाट्यावर आले आहे. उत्तर प्रदेशात सध्या सहायक शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या साठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र आलेल्या बऱ्याच अर्जांत चक्क महात्‍मा गांधीपासून ते अमिताभ बच्‍चनपर्यंत अनेक नावांचा समावेश आहे. एवढेच नाही तर अर्जावरील माहितीनुसार महात्‍मा गांधींनी मेरिट लिस्‍टमध्ये 94% गूण घेत टॉपवर आहे. उत्तरप्रदेशात 16,448 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
या नावांचे आले आहेत 15 अॅप्लिकेशन...
- एजुकेशन डिपार्टमेंटचे अधिकारी प्रवीण मणि त्रिपाठी यांनी दिलेल्या माहिती नुसार, "गांधीजी आणि अमिताभ बच्चन सारख्या नावाचे साधारपणे 15 अर्ज आले असल्याचे समजते.
- पुढे बोलतांना ते म्हणाले की, " मेरिटलिस्टमध्ये आलेल्या नावाच्या तपासणीसाठी एक कमिटीदेखील तयार करण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, का करण्यात आले असे अर्ज...
बातम्या आणखी आहेत...