आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Man Who Arrested Advani May Again Headache To Bjp

BJP साठी अडचणीचे ठरु शकतात अडवाणींना अटक करणारे हे माजी IAS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर के सिंह - Divya Marathi
आर के सिंह
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) निवडणूक प्रचारात जोर पकडला आहे. मात्र एनडीएचा प्रमुख भारतीय जनता पक्षाला आपल्याच नेत्यांकडून घेरले जात आहे. त्यामुळे हे नेते 'गोतास काळ' ठरतात का अशी चर्चा सुरु आहे.
भाजपमध्ये तिकिट विक्रीचे राजकारण अजून शांत झालेले नाही. सीवानचे आमदार विक्रम कुंवर यांच्यावर तिकिट विक्रीचा आरोप झाल्यानंतर भाजप खासदार आणि माजी आयएएस अधिकारी आर.के.सिंह यांनी देखील तिकिट विक्रीचे आरोप केले होते. त्यामुळे पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशाचत माजी केंद्रीय मंत्री अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली आहे. सिन्हा यांनी सिंह यांची बाजू उचलून धरली आहे.
असंतुष्टांचा गट सक्रिय, सिंह देखील आले समोर

बिहार विधानसभेत तिकिट वाटपावरुन आणि इतर जबाबदाऱ्यांपासूनही दूर ठेवल्याने पक्षातील असंतुष्टांचा एक गट सक्रिय झाला आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वीच भगवा झेंडा हातात घेऊन राजकारणात उतरलेले केंद्रीय गृह सचिव राहिलेले माजी आयएएस अधिकारी आर. के. सिंह बिहार भाजपमधील असंतुष्टांचे नेतृत्व करत आहेत. ते कोणाचाही तमा बाळगत नाहीत त्यामुळे आगामी काळातही त्यांचे असेच वक्तव्य येऊन पक्षासमोर संकट उभे राहाण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण आहेत आर के सिंह, कसे आले राजकारणात