आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणार 40 लाख रुपये; आईवडिलांना वेगळे दिले जाणार 10 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेश सरकारने शहिदांच्या वारसांना मिळणाऱ्या रकमेत दुपटीने वाढ केली आहे. शहिदांच्या वारसांना आता ४० लाख रुपये दिले जातील. त्याचबरोबरच शहिदांच्या मातापित्यांना १० लाख रुपये वेगळे देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी शनिवारी परेड ग्राऊंडवर पोलिस स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली.  या वेळी त्यांनी ६ शहीद पोलिसांना आदरांजली वाहून वारसांना स्मृतिचिन्हे प्रदान केली.  

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार पोलिस जवानांसाेबत आहेत. गुन्हेगारीमुक्त, भयमुक्त राज्य बनवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विशेष पोलिस पथक व दहशतवादविरोधी पथकांनी चांगली कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशात पोलिसांची प्रतिमा फ्रेंडली बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

गुंडांसाेबत पोलिसांच्या ५४५ चकमकी झाल्या. या चकमकीत डोक्यावर बक्षिसे असणारे २२ गुंड ठार झाले. सायबर क्राइम वाढल्याने लखनऊ व गाझियाबाद येथे सायबर ठाणी तयार करण्यात आली. जनतेच्या मनात सुरक्षेची भावना वाढीस लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे योगी म्हणाले. 

७६ पोलिस शहीद  
गेल्या वर्षी ७६ पाेलिस शहीद झाले. आकडेवारीनुसार, देशभरात फक्त उत्तर प्रदेशात शहीद पोलिसांची संख्या जास्त होती. शहिदांमध्ये दोन मंडळ अधिकारी, एक निरीक्षक, १५ फौजदार, १६ मुख्य जमादार व ४२ हवालदार शहीद झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...