मुझफ्फरनगर- पुरी-हरिद्वारदरम्यान धावणारी उत्कल एक्स्प्रेस रेल्वेगाडी खाटौलीजवळ रुळांवरून घसरली होती. शनिवारी ही घटना घडल्यानंतर या रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या बोग्या काढण्यासाठी आता यंत्रणा कामाला लागली असून स्थानिक बघ्यांचीही येथे प्रचंड गर्दी दिसून आली.