भारताला स्वतंत्र मिळाले, विविध संस्थान खालसा झाली, मात्र आजही गादीसाठी देशात विविध ठिकाणी युद्ध सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रेदशातील कुटलौहड प्रांताचा राजा कोण यावरून भावा-भावामध्ये वाद चालू आहेत.
आदीम काळापासून आपल्या देशात राजेशाही असल्यामुळे अनेक राजांनी स्वराज्यासाठी आणि गादीसाठी रक्त सांडले असल्याची उदाहरणे कमी नाहीत. अनेक परकियांनी भारत देशावर आक्रमन केली. देशातील विविध प्रकारची संपत्ती लुटली. विविध करार झाले. तह झाले. इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. अनेक क्रांतीकारकांनी बलिदान दिले. त्यानंतर देश स्वतंत्र झाला. भारताने लोकशाही प्रणाली स्विकारली मात्र, आजही गादीसाठी देशात युद्ध होत आहेत. हिमाचल प्रदेशमधील ऊन जिल्ह्यातील कुटलौहड संस्थानामध्ये गादीवर कोण बसणार यावरून दोन भावामध्ये संघर्ष सुरू आहे.
जिल्ह्यातील पुर्व संस्थान कुटलौहडचे राजा महेंद्र पाल यांचे 16 दिवसापुर्वी निधन झाले. मात्र महेंद्र पाल यांची दोन मुले टिका बुद्धेश्वर आणि रूपेंद्र पाल या दोघांनी स्वत:ला राजा घोषीत करून राज्यभिषक केला आहे. यामुळे दोन भावांमध्ये संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा यांच्या राज्याभिषकाची फोटो...