आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांच्या भाची दीपा जयकुमारने स्थापन केला नवा पक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 चेन्नई- जयललितांची भाची दीपा जयकुमारने शुक्रवारी अम्मांच्या जयंतीच्या दिवशी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. एमजीआर- अम्मा- दीपा फोरम असे नव्या पक्षाचे नाव ठेवले आहे. जयललितांच्या आर. के. नगर या रिक्त विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणाही दीपाने केली आहे.
 
जयललितांच्या ६९ व्या जयंतीदिनी दीपाने आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी गप्पा मारल्या. आपणच जयललितांच्या राजकीय वारस असल्याचा दावा करत त्यांचा वारसा पुढे चालवणार आहे, असे ती म्हणाली.
बातम्या आणखी आहेत...