आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीच्या नावावर ऑनलाइन फसवणुकीची नवी पद्धत... असा फोन कॉल आलाय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - देशात जीएसटी लागू होताच ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळीने लोकांना फसवण्याच्या तऱ्हा बदलल्या आहेत. आता जीएसटीच्या नावावर फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. लोकांना म्हणून करून जीएसटीमध्ये खाते आणि एटीएम कार्ड अपडेट करण्याची बतावणी करून जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांत आतापर्यंत या प्रकारच्या काही तक्रारीही आल्या आहेत.
- फोन करणारे हे कावेबाज बदमाश तुमच्याशी अगदी नव्या अंदाजात बोलतात. पोलिसांत आलेल्या तक्रारीवरून, फोन करणारा कॉल रिसिव्ह करणाऱ्याला म्हणतो की, आता सर्व देश एक झाला आहे. पूर्ण एक देश, एक कर आणि एकच बँक फॉर्म्युला असल्याचे सांगण्यात येत आहे. याच प्रकारच्या बाता मारून तुम्हाला बँकेचे रेकॉर्ड अपडेट करण्याविषयी सांगून माहिती विचारली जाते. 
- जीएसटीमुळे बँक खाते अपडेट करण्याचे काम सुरू आहे, सांगितले जात आहे. याचाच फायदा घेऊन लोकांना त्यांचे खाते आणि आधार नंबरची माहिती विचारली जाते. राजधानीतील अनेक लोकांना या प्रकारचे कॉल आलेले आहेत. आतापर्यंत दोन लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना खाते क्रमांक आणि पासवर्डही विचारण्यात आला, यावरून शंका आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

हॅलो... मी बँकेतून बोलतोय
- शंकरनगरमध्ये राहणारे इंजिनिअर पोषण साहू यांना शुक्रवारी सकाळी फोन आला. त्यात  कॉल करणाऱ्याने स्वत:ला बँक मॅनेजर असल्याचे सांगून म्हटले की, देशात जीएसटी लागू झाल्याने सर्व बँकांचे सर्व प्रकारचे कार्ड आणि खाते अपडेट केले जात आहे. सर्व कार्डचा पासवर्ड एकाच प्रकारच्या सिरीजचा करण्याची तयारी सुरू आहे. जर तुमचे खाते अपडेट झाले नाही तर ते ब्लॉक केले जाईल.
- यावर इंजिनिअरने मात्र शंका आल्याने स्वत: बँकेत जाऊन सर्व माहिती देणार असल्याचे सांगितले. कॉल करणाऱ्याने यावर विविध प्रकारे त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला, पण इंजिनिअर महाशय त्याला बधले नाहीत आणि बदमाशाने कॉल कट केला.

कुणालाच खात्यासंबंधी माहिती देऊ नका
ऑनलाइन गंडा घालणाऱ्यांची सातत्याने धरपकड सुरू असते. यावर वेळोवेळी माध्यमांत बातम्याही येत असतात. गावागावांत लोकांना जागरूक करण्याचे काम सुरू आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपद्वारेही या प्रकारांना बळी न पडण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.
- सत्येंद्र पांडे, डीएसपी क्राइम
बातम्या आणखी आहेत...