आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी आदित्यनाथ बनणार मोदींचे उत्तराधिकारी? \'हिंदू दहशतवादी\' न्यूयॉर्क टाइम्समध्ये उल्लेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अमेरिकी वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाइम्सने (NYT) यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांना 'हिंदूं'ना श्रेष्ठ मानणाऱ्या मंदिराचा नेता असल्याचे सांगितले. या वृत्तपत्र, प्रत्येकाला असे वाटते की नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी बनण्याची सर्वात जास्त शक्यता योगींमध्येच आहे, असे सांगण्यात आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने मागच्या मार्चमध्ये आपल्या संपादकीयमध्ये योगी यांना मुस्लिमविरोधी नेता असल्याचे म्हटले होते. त्यात यूपीचे मुख्यमंत्री ठरवण्याच्या नरेंद्र मोदींच्या निर्णयावर टीका केली होती. 
 
लेखात योगींबद्दल आणखी काय काय लिहिले...
- न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या एका लेखात - 'फायरब्रँड हिंदू क्लेरिक असेंड्स इंडियाज पॉलिटिकल लॅडर'मध्ये लिहिले की, "योगी यांना भारताच्या सर्वात जास्त् लोकसंख्येच्या राज्यात शासन चालवण्यासाठी एका हिंदू योद्ध्याच्या रूपात निवडण्यात आले आहे. आदित्यनाथ यांना बहुतांश लोक योगी म्हणून बोलवतात. योगी एसीचा वापर करत नाहीत. जमिनीवर झोपतात. ते
डिनरमध्ये कित्येकवेळा फक्त सफरचंदच खातात."
- परंतु योगी आदित्यनाथ यांच्या प्रसिद्धीचे कारण योग्य नाही. ते अशा मंदिराचे नेतृत्व करतात ज्याची ओळख हिंदूंना श्रेष्ठ मानणाऱ्या कट्टरवादी परंपरेच्या रूपात आहेत. योगी यांनी मुस्लिमांच्या ऐतिहासिक चुकांचा बदला घेण्यासाठी युवा वाहिनीही बनवून ठेवली आहे.
- योगी यांच्या पार्श्वभूमीशी निगडित परंपरांबद्दल न्यूयॉर्क टाइम्सने हेही लिहिले की, 1969 पर्यंत मंदिराचे प्रमुख राहिलेले दिग्विजय नाथ यांना एकदा अटक करण्यात आली होती. त्यांच्या उत्तराधिकारी बनलेले महंत अवैद्यनाथ यांच्यावर 1992 मध्ये हिंदूंना भडकावण्याचा आरोप होता.
 
मोदींचे उत्तराधिकारी होऊ शकतात योगी
- वृत्तपत्रातील लेखात अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ सदानंद धुमे म्हणाले की, मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या रूपात योगी कुणाचीही पसंत असणे स्वाभाविक आहे. तीन वर्षांआधी त्यांना एवढे कट्टर मानले जात होते की, टेक्सटाइल मंत्रालयात राज्यमंत्रीही बनवले नव्हते. पण आता सर्वकाही सामान्य झाले आहे.
- ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारे प्रोफेसर आशुतोष वार्ष्णेय म्हणतात, योगी यांना सीएम बनवण्याचा हा अर्थ आहे की तुम्ही त्यांना अशी ताकद देत आहात जी सहजासहजी परत घेता येणार नाही. मोदी त्यांच्या वाढणाऱ्या प्रभावाला रोखू इच्छित नाहीत किंवा ते रोखू शकत नाहीयेत.
बातम्या आणखी आहेत...