आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Official Countdown For Blast Off Of The Indian Orbiter, Nicknamed Mangalyaan

भारताची मंगळ मोहीम आजपासून होणार प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतिक्षा आहे तो क्षण उद्या मंगळवारी साकार होण्यासाठी सज्ज झाला आहे. देशाची आत्तापर्यंतची सर्वाधिक महत्वकांक्षी मंगळ मोहीम उद्या प्रारंभ होईल. श्रीहरी कोटाच्या सतीष धवन अंतराळ केंद्राहून मंगळ यानाचे दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी प्रक्षेपण होईल. प्रक्षेपणानंतर प्रक्षेपक यान चाळीस मिनिटात पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. हे यान 20 ते 25 दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहील. त्यानंतर 1 डिसेंबरला 40 कोटी किलोमिटर लांब असलेल्या मंगळ ग्रहाकडे ते झेप घेईल. प्रक्षेपण यशस्वी झाले तर भारत जगातील मोजक्या देशांच्या श्रेणीत येईल.