आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायीच्या नावावर आणखी एक मनुष्यबळी; जमावाने ड्रायव्हरला ठार मारले, वाहनाला आग लावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहनात बीफ असल्याच्या संशयावरून ड्रायव्हरला थांबवण्यात आले होते. - Divya Marathi
वाहनात बीफ असल्याच्या संशयावरून ड्रायव्हरला थांबवण्यात आले होते.
अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गायीच्या नावाखाली वाढत्या हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. गुरुवारी साबरमती आश्रमात गोरक्षेच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना ते भावुक झाले. आपल्या बालपणीचा एक किस्सा सांगून त्यांनी गोरक्षकांना अहिंसेचा संदेश दिला. आम्हाला गायीच्या नावाखाली एखाद्याला ठार मारण्याचा हक्क आहे का? ही कोणती गोभक्ती? हा गांधीजी- विनोबांचा मार्ग असूच शकत नाही. आम्ही कसा काय संयम सोडत आहोत? गायीच्या नावाखाली माणसांना ठार मारणार का? असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
पोलिस म्हणाले...
- व्हॅन ड्राइवर अलीमुद्दीन (42) गुरुवारी सकाळी 10.30 वाजता गोला येथून रामगडला पोहचला. 
- यावेळी काही लोकांनी त्याच्या वाहनात गोमांस असल्याचा आरोप केला आणि वाहनाची झळती घेतली. काहींनी मध्येच येऊन अलीमुद्दीनला मारहाण सुरू केली. 
- काही क्षणांतच वाहनाभोवती गर्दी जमा झाली आणि सर्वांनी मारहाण सुरू केली. त्यापैकी काहींनी व्हॅन पेटवून दिली. 
 
पोलिसांनी जमावापासून दूर नेले
- घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी ड्रायव्हरला जमावापासून दूर नेले तेव्हा तो मरणासन्न अवस्थेत होता. गंभीर जखमी अलीमुद्दीनला रुगणालयात भरती करण्यात आले. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला. 
- पोलिस उप-महानिरीक्षक भीमसेन टूटी यांनी घटनेला अधिकृत दुजोरा दिला. तसेच वाढता तणाव लक्षात घेता परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...