आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Principal Of An Engineering College Was Hacked To Death In The College

रँगिंग-बेशिस्त वागणूकीमुळे हाकलून दिलेल्या विद्यार्थ्यांनी केला प्राचार्यांचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुनलवेली - येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची तीन विद्यार्थ्यांनी गळा चिरून हत्या केली आहे. प्राचार्यांनी महाविद्यालाच्या तीन विद्यार्थ्यांना बेशिस्तीच्या कारणामुळे होस्टेल सोडून जाण्याचे आदेश दिले होते. या विद्यार्थ्यांनी आज (गुरुवार) सकाळी प्राचार्यांचा गळा चिरून खून केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वालंदू येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एलडीआर सुरेश (55) यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. रॅगिंग, बेशिस्त वागणूक व इतर तक्रारींमुळे प्राचार्यांनी तीन विद्यार्थ्यांना हॉस्टेल रिकामे करण्यास सांगितले होते. त्याच विद्यार्थ्यांनी त्यांचा खून केला आहे. तीनही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार धारदार शस्त्राने गळ्यावर आणि शरीरावर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आज महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळी भेट दिली आहे.