आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Results Are Announced Of All India Essay Writing Competition

दैनिक भास्कर-जयपूर साहित्य महोत्सव अखिल भारतीय हिंदी लेखन स्पर्धेचे विजेते घोषित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- हिंदी भाषेचे अस्तित्व आणि सार्थकतेला दृष्टिकोनातून समजावण्यासाठी दैनिक भास्करच्या वतीने अखिल भारतीय हिंदी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देशभरातून हजारो संख्येने एंट्री आल्या. लेखनात आवड असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेच सहभाग नोंदवला. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्यी सहयोगाने आयोजित ही स्पर्धा साहित्य प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्र ठरली.
विजेत्यांची निवड तीन श्रेणींमध्ये करण्यात आली. पहिल्या टप्यात दैनिक भास्करच्या संपादकीय टीमने सहभाग घेतलेल्यांची निवड केली. दुस-या टप्यात तीन सदस्यांना ज्यूरीने सहभाग घेतल्यांचे परिक्षा घेतली. पॅनलमध्ये राजस्थान यूनिव्हर्सिटीचे निवृत्त प्रध्यापक डॉ. सरस्वती माथुर, प्रोफेसर, वीरबाला भावसर आणि महिला साहित्य संस्थान 'स्पंदन'चे अध्यक्ष निलीमा टिक्कू सामील होते. तिस-या टप्यात दैनिक भास्करचे संपादकीय विभागाचे वरिष्ठ सदस्य समितीने पॅनलची शॉर्टलिस्ट नोंदणीमधील तीन विजेत्यांना निवडले.
या स्पर्धेचा विषय "हिंदीमध्ये इतर भाषांच्या शब्दांचा वापर, हिंदीसाठी वरदान की शाप" होता. या विषयावर 1000 शब्दांमध्ये लिहायचे होते. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत दतीन विजेत्यांना 21 ते 25 जानेवारीपर्यंत पुरस्कराच्या रुपात 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. दैनिक भास्कर जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये 'भास्कर भाषा सीरिज'चेसुध्दा आयोजन करण्यात येणार आहे.
टॉप 3 विजेते-
हरियाणाचा नवरत्न पांडे, इंदोरचे डॉ. सरोज बिलोरे आणि भोपाळची अंकिता त्रिपाठी हे स्पर्धेचे विजेते आहेत. हे दैनिक भास्करच्या वतीने जेएलएफमध्ये सहभाग घेणार आहेत.
सांत्वना पुरस्काराचे विजेते-
भीलवाडाचे अर्पित कचौलिया, भोपाळची पूजा कुशवाह, कुरुक्षेत्रचे डॉ. रविश कुमार चौहाण, उदयपूरची दीपिका कुमारी सेवक, पानीपतची एकता रोहिल्ला, अजमेचे मनीष कुमार चौहाण, उज्जैनचे शुभम शर्मा.