आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात समाजकंटकांची पोलिसांवर दगडफेक, जाळपोळ; धार्मिक स्थळाचा वाद चिघळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांसवाडा- राजस्थानातील बांसवाडा येथील खांटवाडामध्ये धार्मिक स्थळावरून निर्माण झालेल्या वादानंतर शुक्रवारी परिस्थिती आणखी चिघळली. सकाळच्या वेळी पोलिस एका गटाची समजूत काढत होते. यादरम्यान, एका गल्लीतून अचानक दगडफेक सुरू झाल्याने एकच गदारोळ उडाला. त्यानंतर परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली की, पोलिसांना  परिस्थितीवर काबू ठेवण्यास कित्येक तास परिश्रम घ्यावे लागले. 

दरम्यान, समाजकंटकांनी सुमारे १५ ते २० घरांना आग लावली. प्रत्येक गल्लीबोळात कार व दुचाकी वाहने जळत होती. समाजकंटकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या दगडफेकीत एक सहायक फौजदार आणि ३ पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर येथे संचारबंदी लावण्यात आली. दरम्यान, अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. 
 
समाजकंटक जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या समक्ष जाळपोळ करत होते. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिस केवळ त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत हाेते. पोलिस एका गल्लीत जमावास शांत करत होते तर समाजकंटक दुसरीकडे दगडफेक करत होते. गर्दीला पांगवण्यासाठी अश्रुधूर सोडत होते. परंतु वाद वाढत गेला. नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी  ७० समाजकंटकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...