आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Train Hit The Tractor, Killing Three People In Jalandhar

फाटक बंद करणे विसरला गेटमन; क्रॉसिंगवर रेल्वेची ट्रॅक्टरला धडक, सहचालकासह तिघांचा मृत्यु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- फिरोजपूरहून जालंधर जाणार्‍या एका रेल्वे गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली. या दुर्घटनेत इंजिनाच्या सहचालकासह तिघांचा मृत्यु झाला. शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटना घडली तेव्हा रेल्वे फाटक उघडे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बरयाना रेल्वे क्रॉसिंगवर ही दुर्घटना घडली. रेल्वे फाटक उघडे असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. फाटक बंद करण्याचा गेटमनला विसर पडला होता. या घटनेवरून रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दुर्घटनेत रेल्वे इंजिनच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. रेल्वेचा सहचालक आणि ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळी मृत्यु झाला.

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी या भागात धुके पसरले होते. त्यात क्रॉसिंगवर गेट उघडे होते. त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. धडक होताच ट्रॅक्टर रुळाच्या बाजूला उलटले. मातीने भरलेली ट्रॉली 500 मीटर अंतरावर घसरत गेली.