आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफा शोरूममध्ये चोरी, 30 किलो सोन्याची लूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - शहरातील पंजागुट्टा भागात असलेल्या तनिष्क या सोन्याच्या दागिन्यांच्या शोरूममधून चोरट्यांनी 30 किलो सोन्याची लूट केली आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे 9 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.शोरूमच्या मागील दाराने शुक्रवारी रात्री चोरांनी आत प्रवेश केला. दागिने चोरून त्याच मार्गाने ते पसार झाले. शोरूममध्ये लागलेल्या कॅमे-यांमध्ये ही घटना कैद झाली. कॅमे-यात एक जण चोरी करताना दिसत आहे.
तथापि, इतर काही चोरटेही या लूटमारीच्या घटनेत सहभागी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात ही चोरीची घटना घडली आहे.