Home »National »Other State» Then Locked It In The Room

तुझ्या पतीचा अॅक्सिडेंट झालाय सोबत चल, असे म्हणून नेले अन् केले असे काही...

तुझ्या पतीचा अपघात झाला आहे, त्याला घेऊन जा असे सांगत आपल्याला अनोळखी ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने प

दिव्य मराठी वेब टीम | Oct 13, 2017, 01:00 AM IST

समाना (पतियाळा)-तुझ्या पतीचा अपघात झाला आहे, त्याला घेऊन जा असे सांगत आपल्याला अनोळखी ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने पोलीसात नोंदवली आहे. या प्रकरणी पोलीसात अजय गोयल नाव्याच्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार अजय गोयल नामक एक तरुण आपल्याला फोन करून सतत त्रास देत होता. फोनवर बोलण्यासाठी तो नेहमी वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करायचा. एक दिवस अजयने आपल्या पतीचा अपघात झाला असे सांगितले. ते भवानीगढच्या रस्त्यावरील एका घरात असून त्यांना घेऊन जा असे सागण्यात आले. पीडित महिलेच्या फिर्यादी नुसार ती महिला बस स्टॅन्ड वर पोहचली, तेव्हा एक अनोळखी तरुण मोटार सायकलवर बसवून मला त्याठिकाणी घेऊन गेला. तरुणाने चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता. घराजवळ पोहचले तेव्हा तिथे फक्त अजय गोयल होता. त्यानंतर त्याने घरात कोंडून माझ्यावर बलात्कार केला असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

बुधवारी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी अजय गोयलविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा कसा घडला घटनाक्रम...

Next Article

Recommended