आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात रात्री 10 नंतरच्या पार्ट्यांना कायदेशीर बंदी, मुख्यमंत्री पर्रिकर यांची स्पष्टोक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कायद्याने ज्या गोष्टींसाठी मनाई आहे, त्या गोव्यात होऊ देणार नाही असे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले. - Divya Marathi
कायद्याने ज्या गोष्टींसाठी मनाई आहे, त्या गोव्यात होऊ देणार नाही असे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
पणजी - कायद्याने ज्या गोष्टींसाठी मनाई आहे, त्या गोव्यात होऊ देणार नाही असे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले. गोवा कॅबिनेटच्या एका मंत्र्यांनी राज्यात रात्री उशीरा होणाऱ्या पार्ट्यांवर आणि रेव्ह पार्ट्यांवर बंदी लावण्याची मागणी केली होती, त्यावर पर्रिकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 
 
गोव्याचे पाणी पुरवठा मंत्री विनोद पाल्येकर यांनी राज्यात रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या बंद करू असे विधान नुकतेच केले होते. एवढेच नव्हे, तर पोलीस आणि प्रशासन राज्यातील समुद्र तटांवर होणाऱ्या कथित अमली पदार्थ तस्करीवर दुर्लक्ष करत आहे असे आरोपही त्यांनी लावले होते. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले...
 
"गोव्यात रात्री 10 नंतर पार्ट्या करण्यावर कायद्याची बंदी आहे. राज्य सरकारने सुद्धा त्या नियमाच्या आधीन राहण्याचा निर्णय घेतला. यात वादग्रस्त असे काहीही नाही." यासोबतच राज्यात अमली पदार्थ तस्करी, अनाधिकृत जुगार आणि देहविक्रयावर अंकुश लावण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला कठोर निर्देश देण्यात आले. पाल्येकर ज्या बंदीची मागणी करत आहेत, ती राज्यात आहेच... असेही ते पुढे म्हणाले.
 
काय म्हणाले होते पाल्येकर
आपल्या राज्यातील समुद्र तट अमली पदार्थ तस्करांनी दूषित झाले आहेत. यावर कुणाचेही नियंत्रण नसून असले प्रकार थांबविणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला रात्री होणाऱ्या पार्ट्या आणि अमली पदार्थांची तस्करी तात्काळ थांबवावी लागेल. रात्री उशीरा होणाऱ्या पार्ट्या आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहेत. 
 
पाल्येकर सिओलिम मतदार संघातून आमदार असून त्यांच्या मतदार संघ दरवर्षी लाखो देशी-परदेशी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या समुद्र तटांनी व्यापलेला आहे. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी वाद निर्माण केला होता. त्यावर प्रर्रिकरांनी यात वादग्रस्त काहीच नसल्याचे स्पष्ट केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...