आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५६ वर्षांपासून पोलिस ठाऊक नसलेले गाव; चर्चेतून सोडवतात गावातील वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागौर- राजस्थानातील धिंगावास गावात पोलिस आहे; परंतु ते शब्दश: नावालाच. अकार्यक्षम अशा अर्थाने नव्हे, तर गावातील लोकांना त्यांची कधी गरजच भासत नाही. ५६ वर्षांपासून गाव गुण्यागोविंदाने राहते. त्यामुळे कोर्टाची पायरीदेखील त्यांना ठाऊक नाही. म्हणूनच हे गाव पंचक्रोशीतील इतर गावांसाठीही आदर्श ठरले आहे.
गावात भांडण-तंटा होत नाही, असा त्याचा अर्थ नाही. गावात भांडणे होतात, परंतु गावातील पारावरच ती निवळतात. दोन्ही पक्ष चर्चा करतात आणि त्यातून तोडगा काढण्यात येतो. गेल्या पन्नास वर्षांत जमिनीवरून एक प्रकरण वगळता तसा वाद कधीही होत नाही. ते प्रकरणही सामोपचाराने सोडवण्यात आले. ते प्रकरण ठाण्यात गेले होते. मात्र, त्यातील आरोपी इतर गावांतील होते. या गावातील न्यायप्रणाली पाहून कोणीही चकित होईल. हे गाव १०० वर्षांपूर्वी वसले होते. त्यावेळी गावात केवळ आठ उंबरे होते. सध्या ते ८०० वर आहेत. गावातील लोकांमध्ये प्रेम-बंधुभाव आहे. वर्षानुवर्षे या गोष्टी जोपासण्यात आल्या आहेत. शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे ही मानवी मूल्ये होत, असे गावातील बुजुर्ग मंडळी सांगतात. शांतताप्रिय गाव म्हणून लोकप्रिय झालेल्या या गावात आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमधील लोकही राहायला आले आहेत.
गावात जाट, राईका, नायक, मेघवाल, सैन जातीची कुटुंबे आहेत. विवाह समारंभापासून इतर आयोजनासाठी बाहेरून मंडप, आचारी, ढोल बोलावण्यापेक्षा गावातीलच लोक परस्परांना हे काम देतात. कोणीही कोणाच्या घरी पाहुणा म्हणून जात नाही.
बातम्या आणखी आहेत...