आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Will Be Consequences Chhota Shakeel Threatens To India

याकूबच्या फाशीचे परिणाम भोगावे लागतील, छोटा शकीलची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - याकूबच्या फाशीनंतर 1993 च्या बॉम्बस्फोटात सहभाग असलेल्या इतर गुन्हेगारांचा तिळपापड होत आहे. साखळी स्फोटांतील फरार आरोपी आणि दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकील याने अशाच प्रकारे याकूबच्या फाशीनंतर त्याचा राग व्यक्त केला आहे. भारताला याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांच छोटा शकीलने धकमी दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला फोन करून शकीलने ही धमकी दिली आहे. याकूबला भारतात परत आणताना दिलेली वचने पाळली नसल्याचे छोटा शकील म्हणाला आहे.

अशा प्रकारे फाशी देऊन भारताने दाऊद किंवा इतर फरार आरोपींचे भारतात येण्याचे सर्व दरवाजे स्वतःच बंद केल्याचेही छोटा शकील म्हणाला. दाऊदभाई देखिल शरणागती पत्करून भारतात येणार होता. तो जर आला असता तर त्याचेही असेच हाल करून शेवटी फाशी देण्यात आली असती, हे स्पष्ट झाले असल्याचे शकील म्हणाला आहे. या फाशीतून भारत सरकारला काय संदेश द्यायचा आहे. तुम्ही एका निरापराधाला त्याच्या भावाच्या गुन्ह्याची शिक्षा दिली असून, डी कंपनी त्याचा निषेध करत असल्याचे छोटा शकील म्हणाला. या फाशीनंतर त्याचे परिणाम तर होणारच, (वो तो होगा ही) अशा भाषेत छोटा शकीलने धमकीही दिली आहे.

यापुढे कंपनीतील किंवा इतरही कोणताच आरोपी भारतीय गुप्तचर संस्थांच्या कोणत्याची आमिषाला बळी पडणार नसल्याचे तो यावेळी म्हणाला. याकूबच्या खटल्याचा जवळून अभ्यास केला असल्याचे सांगत त्याने या निर्णयावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. याकूब निर्दोष होता तर टायगरचा यात हात होता का अशी विचारणा केली तेव्हा शकील म्हणाला. त्याच्या सहभागाबाबत आरोपपत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्या भारत सरकारने मात्र ज्या व्यक्तिने ऑडिओ, व्हिडिओ अशा स्वरुपातील पुरावे आणले त्याच्या विरोधातच खटला चालवला. मग त्याचा शरणागती पत्करून काय मिळाले ? असा सवाल शकीलने केला.

याकूबने भारतीय गुप्तचर संस्थांशी चर्चा करून शरणागती पत्करली होती. पण त्याला फाशी देऊन काय फरक पडला? काही नवीन हाती लागले का? उलट त्याच्यावर अत्याचारच झाले. कोणीतरी भारत सरकारवर विश्वास ठेवला, पण त्याचा विश्वासही सांभाळण्यात सरकार अपयशी ठरले. त्यामुळे कंपनीला आता सरकारवर विश्वास नाही. जीव द्यायला कोण परत येणार? अशा शब्दांत शकीलने राग व्यक्त केला.
याकूबची बायको काही दिवसांनी चिमुकल्या बाळासह भारतात परतली. पण तिलाही तुरुंगात टाकण्यात आले. तिला काय न्याय मिळाला? याकूबचा दाऊदशी कोणताही संबंध नव्हता असा दावाही यावेळी बोलताना शकीलने केला. भारतीय गुप्तचर संस्थांवर त्याने प्रामुख्याने हल्ला चढवला होता.
पुढील स्लाइडवर वाचा, उज्ज्वल निकम यांच्याबाबत काय म्हणाला, शकील...