आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुळावरून धावणार्‍या व्हिडीओ शुटरला करताना रेल्वेने उडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरूवनंतपुरम- सोशल नेटवर्किंग साइटवर विचित्र छायाचित्र अपलोड करण्याचा मोह जीवघेणा ठरल्याच्या दोन घटना नुकत्यात उघडकीस आल्या आहेत. रेल्वे रुळावरून धावताना व्हिडिओग्राफी करण्याचा प्रयत्न एका 16 वर्षीय मुलाच्या प्राणावर बेतणारा ठरला. दुसºया घटनेत फाशीचे नाटक करणे एका तरुणाचा जीव गमावणारे ठरले.

एडविन नावाच्या तरुणाला रेल्वे रुळावर धावतानाचा फोटो काढून सोशल नेटवर्किंग साइटवर टाकण्याची इच्छा होती. त्यानुसार सर्व तयारी झाली. त्याच्या काही मित्रांनी व्हिडिओ कॅमेरा घेतला. एडविनने ठरल्याप्रमाणे रुळावरून धावण्यास सुरुवात केली. त्याच वेळी मागून येणाºया गाडीने चिरडले.