आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रिंसेसच्या नवऱ्याकडे आहे 80 हजार कोटींची संपत्ती, महाल तर नुसता पाहात राहावा असा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डूंगरपूरचे महाराज हर्षवर्धनसिंह यांची कन्या तृषिकाचा म्हैसूरच्या महाराजांशी विवाह होत आहे. - Divya Marathi
डूंगरपूरचे महाराज हर्षवर्धनसिंह यांची कन्या तृषिकाचा म्हैसूरच्या महाराजांशी विवाह होत आहे.
जयपूर - राजस्थानच्या शाही परवारातील मुलीचा म्हैसूरच्या राजघराण्यात विवाह होणार आहे. दोन्ही कुटुंबांकडे गडगंज संपत्ती आहे. या लग्नानिमित्त divyamarathi.com च्या वाचकांसाठी सांगत आहोत काय आहे या दोन्ही कुटुंबांची पार्श्वभूमी.

- नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर राज्यसभेवर गेलेले हर्षवर्धन सिंह यांची मुलगी आहे तृषिका कुमारी.
- तृषिकाचा विवाह म्हैसूरचे राजे यदुवीर यांच्यासोबत होऊ घातला आहे.
- राज्यसभेच्या उमेदवारीवेळी हर्षवर्धनसिंह यांनी त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला होता.
- त्यासोबतच राजपरीवारातील इतर सदस्यांच्या नावावर किती स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे याचीही त्यांनी माहिती दिली होती.

रॉयल हॉटले आणि महालाचे मालक आहे हर्षवर्धनसिंह
- डूंगरपूर येथे हर्षवर्धनसिंह यांचे कुटुंब रॉयल पॅलेसमध्ये राहायला आहे.
- या महालाचे नाव उदय विलास पॅलेस आहे.
- हे त्यांचे निवासस्थानच नाही तर येथेच एक फाइव्हस्टार हॉटेल आहे.
- या हॉटेलच्या प्रत्येक खिडकीतून एक वेगळा नजारा दिसतो.

असे आहे शाही हॉटेल, व्हिंटेज कार्सचा आहे ताफा
- उदय विलास पॅलेस हॉटेल हे रॉयल फॅमिलीच्या विवाह समारंभाशिवाय देश-विदेशातील खास पाहुण्यांच्या विशेष स्वागतासाठी तयार करण्यात आलेले आहे.
- येथे जगभरातील रॉयल फॅमिलीचे विवाह होतात.
- त्यासाठा पॅलेसमध्ये विशेष जागा तयार करण्यात आली आहे.
- तृषिकाच्या लग्नाचे काही विधीही येथे पार पडले आहेत.

जॅग्वार ते मर्सिडिजपर्यंत अनेक कार
- हर्षवर्धनसिंह यांच्या ताफ्यात जॅग्वार ते मर्सिडिजपर्यंत अनेक व्हिंटेज कार आहेत.
- या कार्ससाठी पॅलेसमध्ये एक मोठे गॅरेज आहे.
- पूर्वी येथे अस्थबल होते. येथे राजपरीवारातील घोडे ठेवले जात होते. आता त्याला नवे रुप देऊन येथे कार ठेवल्या जातात.
- उदय विलासमध्ये 23 रुम्स आहेत. त्यातील 17 स्वीट आहे. प्रत्येक रुमला रॉयल लूक देण्यात आलेला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, म्हैसूरच्या राजांचा महाल आणि डूंगरपूरचा राज महाल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...