आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेसलर गीताच्या विवाहाला पोहोचली \'दंंगल\' टीम; आमिर म्हणाला, रियल गिफ्ट पुढील महिन्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चरखी दादरी (हरियाणा)- रेसलर आणि ऑलिम्पिकपटू गीता फोगाट ही रविवारी पहेलवान पवन कुमार याच्यासोबत विवाहबंधनात‍ अडकणार आहे. गीता रात्री आठ वाजता सातफेरे घेईल. उल्लेेखनिय म्हणजे गीता आठवा फेरा ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या अभियानासाठी घेणार आहे
या विवाहाचे खास म्हणजे बॉलिवूड अभ‍िनेता आमिर खान आपल्या टीम 'दंगल'सोबत या गीताला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला आहे.
काय म्हणाला आमिर खान...?
- मीडियासोबत संवाद साधताना आमिर खान म्हणाला की, मी आलो हे, गीतासाठी 'टोकन ऑफ लव्ह' आहे. तिचे वडील महावीर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा दंगल पुढील महिन्यात रिलीज होत आहे. हा सिनेमा तिच्यासाठी रियल गिफ्ट ठरेल.
- माझा सर्व पैसा बॅंकेत आहे. मी तर तिला केवळ आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे.
- बलाली येथे पोहोचलेल्या आमिर खान याने डोक्यावर केशरी फेेटा बांंधला होता.

दंगलमध्ये आमिरची महावीर फोगाट यांची भूमिका..
आमिर खानने आगामी सिनेमा 'दंगल'मध्ये गीताचे वडील महावीर फोगाट यांची भूमिका केली आहे. महावीर यांनी देखील प्रसिद्ध रेसलर म्हणून कीर्ती मिळवली आहे.

आमिरचे सुरक्षारक्षक पोहोचले गीताच्या गावात...
- आमिर खानच्या सुरक्षिततेसाठी एक दिवस आधीच 50 पेक्षा जास्त सुरक्षारक्षक मुंबईहून गीताचे गाव बलाली येथे पोहोचले आहेत.
- आमिरसाठी स्पेशल भाजी बनवण्यात आली आहे. इंग्लंंडची रेसलर याना रॅटिगन हिला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, गीता आणि पवन कुमारच्या विवाहात कोण कोण पोहोचले?
.
बातम्या आणखी आहेत...