आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा माणूस करायचा डेडबॉडीवर रेप, लाखांमध्ये एकाला असतो हा आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निठारी कांडातील 9व्या खटल्यातही कोर्टाने सुरेंद्र कोली व मोनिंदरसिंग पंधेरला दोषी ठरवले आहे. - Divya Marathi
निठारी कांडातील 9व्या खटल्यातही कोर्टाने सुरेंद्र कोली व मोनिंदरसिंग पंधेरला दोषी ठरवले आहे.

गाझियाबाद - संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या यूपीच्या निठारी कांडाच्या 9व्या खटल्यात मनिंदरसिंग पंधेर आणि सुरेंद्र कोली यांना दोषी ठरवण्यात आले आहे. आता या 9व्या खटल्यातील शिक्षावर कोर्ट उद्या सुनावणार आहे. हे प्रकरण सीबीआयच्या विशेष कोर्टात सुरू होते. निठारी कांडात सुरेंद्र कोली आणि मोनिंदरसिंग पंधेर मुख्य आरोपी आहेत. यानिमित्त DivyaMarathi.com निठारी कांडातील मुख्य दोषी सुरेंद्र कोलीबाबत ही माहिती देत आहे. सुरेंद्र कोलीला एक विचित्र आजार होता, ज्यामुळे तो एवढे भयंकर गुन्हे करायचा.


मृतदेहावर बलात्कार करायचा सुरेंद्र कोली
- पोलिस अधिकाऱ्यांनुसार, मोनिंदर पंढेरच्या कोठीमध्ये नेहमी कॉलगर्ल यायच्या. त्यांच्यासाठी सुरेंद्र कोली हा नोकर खाण्यापिण्याची व्यवस्था करायचा.
- यादरम्यान तो त्यांच्याशी लगट करायला बघायचा, पण नोकर असल्याने त्याला कुणीच भाव देत नव्हते.
- म्हणून मग हळूहळू तो नेक्रोफिलिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त होत गेला. यामुळे लहान मुलांबाबत त्याला लैंगिक आकर्षण वाटू लागले.
- याच कारणामुळे जेव्हा आसपास अंधार व्हायचा तेव्हा कोठीसमोरून जाणाऱ्या मुलींना तो धरायचा आणि त्यांचे तोंड बांधून त्यांच्याशी दुष्कर्म करायचा. एवढेच नाही, तो त्यांची हत्या केल्यानंतरही मृतदेहावर रेप करायचा.


10 लाखांतून एकाला असतो नेक्रोफिलिया आजार
- लखनऊच्या केजीएमयूच्या जेरियाट्रिक अँड मेंटल हेल्थ डिपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉ. एस. सी. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, नेक्रोफिलिया एक प्रकारचा मानसिक आजार आहे. हा दुर्मिळातील दुर्मिळ आजारांत गणला जातो.
- हा आजार 10 लाखांतून एखाद्यालाच होतो. मात्र, या आजारामागचे नेमके कारण आजपर्यंत कळलेले नाही. सध्या या आजारावर रिसर्च सुरू आहे.


डेडबॉडीशी सेक्स करतात नेक्रोफिलियाचे पेशंट
- तिवारी म्हणाले की, नेक्रोफिलिया आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती डेडबॉडीशी सेक्स करतात. परंतु त्यांना हे माहीत नसते की, ते असे का करताहेत? कधी-कधी सणक आल्यावर, तर कधी आनंदासाठीही ते असे करू शकतात.
- या आजाराने ग्रस्त रुग्णांचा आकडा सध्या उपलब्ध नाहीये. भारतात हा आजार किती जणांना आहे, याचीही माहिती उपलब्ध नाही. 

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...