आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षल्यांच्या धास्तीने 9 वर्षांपासून रेंगाळलेला पूल जवानांनी 30 दिवसांमध्येच केला पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कनेरी गावात पुलाच्या सुरक्षा व्यवस्थेत आयटीबीपी जवान.वृत्तांत :  श्रीशंकर शुक्ला, (छाया : अजितसिंह भाटिया) - Divya Marathi
कनेरी गावात पुलाच्या सुरक्षा व्यवस्थेत आयटीबीपी जवान.वृत्तांत : श्रीशंकर शुक्ला, (छाया : अजितसिंह भाटिया)
भिलाई -  छत्तीसगडच्या  राजनांदगावपासून ९० किमी अंतरावर नक्षलग्रस्त कनेरी गावात उभारलेला हा पूल याच महिन्यात बांधण्यात आला आहे. १२ वर्षांपूर्वी प्रस्तावित पुलाच्या चर्चेवरूनच नक्षलग्रस्तांनी सरपंच हलौर सिंह यांची हत्या केली होती. २००८ मध्ये एक तात्पुरता पूल तयार झाला, मात्र तो नक्षलींनी उद््ध्वस्त केला.
 
नऊ वर्षे पूल बांधण्याचे प्रयत्न झाले, मात्र नक्षलींच्या धास्तीमुळे ते होऊ शकले नाही. यामुळे आयटीबीपीची मदत घेतली. या वर्षी एप्रिलमध्ये कामास सुरुवात झाली आणि ३० दिवसांत ते पूर्णत्वास आले. यामुळे ६० गावांतील १० हजार  नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अाता त्यांना कोणत्याही कामासाठी २० किमी दूर महाराष्ट्रात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
बातम्या आणखी आहेत...