आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तलाकला विरोध केल्याने केंद्रीय मंत्री नक्वींच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली-  केंद्रीय मंत्री मख्तार अब्बास नक्वी यांची लहान बहीण फरहत नक्वी यांनी काही युवकांनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. फरहत यांनी सांगितले की, तीन तलाकविरुद्ध मोहीम चालवल्याबद्दल येथील अत्यंत गजबजलेल्या चौकी चाराहा भागात दिवसाढवळ्या काही गुंडांनी हा प्रयत्न केला. एसएसपी कार्यालयातून परतत असताना हा प्रकार घडला. या चौकात एक कार आपल्याजवळ येऊन थांबली. कारमधील युवकाने ‘मी तुला नंतर पाहून घेईन’, असे धमकावले. कारमध्ये नेमके कोण लोक होते, याची ओळख मात्र फरहत पटवून देऊ शकल्या नाहीत.
बातम्या आणखी आहेत...