आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS कनेक्शन : मेहदीच्या ट्वीट्सला रिट्वीट करणा-या तीन तरुणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर - मध्य प्रदेश अँटी काऊंटर टेररिस्ट ग्रुपने जबलपूर येथील आझाद मोहल्ला परिसरातील तीन तरुणांना गुरुवारी अटक केली. ISIS चे ट्वीटर अकाऊंट चालवणा-या मेहदी मसरूर विश्वासच्या ट्वीट्सना रिट्वीट केल्याचा आरोप या मुलांवर लावण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजाद मोहल्ला येथे राहणा-या सोने चांदीच्या कारागिरांवर गुप्तचर संस्था अनेक दिवसांपासून लक्ष ठेवून होत्या. पश्चिम बंगालमधून येणारे हे काराहीर स्थानिक सराफा व्यावसायिकांकडे दागिने घडवण्याचे काम करत होते. सुत्रांच्या मते या सर्व कारागिरांकडे अँड्रॉइड फोन होते आणि त्यांनी मसरूरच्या शमी विटनेस नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या 50 हून अधिक भडक ट्वीट्सना रिट्वीट केले होते.
काउंटर टेररिस्ट ग्रुप आणि जबलपूर पोलिस, दोघांकडूनही या युवकांना पकडण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. मात्र, सुत्रांनी दिलेल्या बातमीनुसार या तरुणांची चौकशी केली जात असून अद्याप त्यांना कस्टडीत पाठवल्याचा खुलासा करण्यात आलेला नाही. सबळ पुरावे मिळताच पोलिस त्यांच्याविरोधात थेट कारवाई करणार आहे.