आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत 39 हजार Cr खर्चून रशियाकडून खरेदी करणार एस-400 ट्रायम्फ एअर डिफेन्स सिस्टिम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - भारत व रशियादरम्यान शनिवारी विविध क्षेत्रांतील १६ सामंजस्य करार झाले. त्याअंतर्गत भारत रशियाकडून ३९ हजार कोटी रुपये खर्चून एस-४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स सिस्टिमची खरेदी करणार आहे. ही यंत्रणा शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून देशाचे संरक्षण करण्यास सक्षम मानली जाते.
संरक्षण यंत्रणेव्यतिरिक्त भारत चार अत्याधुनिक फ्रिगेट व २२६ टी कामोव्ह हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यासंबंधीदेखील रशियासोबत करार झाला आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा देशाचा हा तिसरा प्रमुख संरक्षण करार आहे. याअगोदर अमेरिका व फ्रान्ससोबत देशाचा संरक्षण करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शनिवारी शिखर बैठकीनंतर भारत व रशिया यांच्यात संरक्षण, ऊर्जा क्षेत्रातील मोठे सौदे झाले. त्यात स्मार्ट शहरांतील विकास, हाय स्पीड रेल्वे, गॅस, बंदर विकास क्षेत्रात सहकार्य इत्यादी क्षेत्रांत उभय देशांत करार झाले आहेत. दोन्ही नेत्यांनी रिमोटचे कळ दाबून कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभही केला. याप्रसंगी त्यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला.त्यानंतर उभय नेत्यांनी पत्रकार परिषदेत करारांची माहिती दिली. पंतप्रधानांनी रशियाकडून भारताला मिळालेल्या समर्थनाबद्दल पुतीन यांचे धन्यवाद व्यक्त केले. दरम्यान, पाकिस्तान व रशिया यांच्यातील नव्या संबंधामुळे राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा होती.
कराराचे फायदे
Áलांब पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली एस ४०० ट्रायम्फ सुमारे ४०० किमी क्षेत्रफळातील शत्रूचे विमान, क्षेपणास्त्र, ड्रोनला नष्ट करू शकते.
Áतीन प्रकारची क्षेपणास्त्रे सोडणे, बहुस्तरीय संरक्षण प्रणाली तयार करणे, सोबत एकाच वेळी ३६ लक्ष्य गाठणे शक्य.
Áरशियाच्या मदतीने दोन युद्धनौकांची निर्मिती केली जाणार आहे. त्याचबरोबर दोनची खरेदी केली जाईल.
Áभारतात चिता व चेतक हेलिकॉप्टरची जागा घेण्यासाठी २०० कामोव्ह व २२६ टी हेलिकॉप्टर निर्मितीच्या गुंतागुंतीच्या करारावरही स्वाक्षरी.
रशियन कंपनी खरेदी करणार ७२ हजार ८०० कोटींत एस्सार ऑइल
जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी रोसनेफ्ट ऑइल कंपनीच्या नेतृत्वाखाली रशियन कंपन्या खासगी क्षेत्रातील दुसरी मोठी भारतीय तेल कंपनी एस्सार ऑइलचे ९८ टक्के समभाग १०.९ अब्ज डॉलरमध्ये (७२, ८०० कोटी रुपये) खरेदी करण्यास रशियाने सहमती दर्शवली आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक आहे. याबरोबर कन्सोर्टियम वाडिनारमधील एस्सारच्या बंदराला १३,३०० कोटी रुपयांत खरेदी करण्यावरही सहमती झाली आहे. त्याचबरोबर कमोडिटी क्षेत्रात रशियन कंपन्या ट्राफिगुरा व खासगी गुंतवणूक कंपनी युनायटेड कॅपिटल पार्टनर्सचाही समावेश आहे. एस्सार ऑयलची वाडिनार येथील रिफायनरीचा देशात रिफायनरीतील एकूण उत्पादनात नऊ टक्के वाटा आहे. देशभरात कंपनीचे २ हजार ७०० आउटलेट आहेत.

देशाचा जुना मित्र
भारत व रशिया यांच्यातील मैत्री अनेक दशकांची आहे. जागतिक आर्थिक, बाजारपेठेतील बदलासारख्या संकटांना सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांनी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्धार बैठकीच्या निमित्ताने व्यक्त केला. दोन्ही देश जुने मित्र आहेत. संयुक्त राष्ट्र, ब्रिक्स, आशियाई संमेलन, जी-२०, शांघाय सहकार्य संघटनेच्या माध्यमातूनही परस्परांना सहकार्य करत आले आहेत. त्या माध्यमातून दोन्ही देशांत जागतिक भागीदारीची महान परंपरा आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरही दोन्ही देशांनी लढण्याचा संकल्प केला आहे.
बातम्या आणखी आहेत...