लुधियाना- पंजाबमधील लुधियाना येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाचे त्याच्या तीन मित्रांनी लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. तरुणाला आधी मद्य पाजली नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर अश्लील व्हिडिओ बनवून इतर मित्रांना पाठवला. याप्रकरणी सलेम टाबरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनय कुमार ऊर्फ छतरी, दीपक कुमार ऊर्फ दीपा व राकेश कुमार ऊर्फ केशी या तिघांनी त्यांच्या एका मित्राला मद्य पाजली. नंतर त्याच्यासोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पीडित तरुणाचा शारीरिक छळ केला. यामुळे पीडितेच्या लिंगाला जखमा झाल्या आहेत. पीडित तरुणाने आरोपींना विरोध केल्यानंतर त्यांना मारहाणही केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. मित्रांच्या लैंगिक छळाला कंटाळून पीडित तरुणाने सलेम टाबरी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेऊन आरोपी विनय कुमार ऊर्फ छतरी, दीपक कुमार ऊर्फ दीपा व राकेश कुमार ऊर्फ केशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.