आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओडीशामध्‍ये 'बीएसएफ'च्‍या ताफ्यावर नक्षल्‍यांचा हल्‍ला, 3 जवान शहीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - ओडिशातील कोरापूट जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळी नक्षलवाद्यांनी घडविलेल्‍या स्‍फोटात सीमा सुरक्षा दलाचे 3 जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी 'आयईडी'चा वापर करुन स्‍फोट घडवला.

बीएसएफ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाच्‍या 3 वाहनांचा ताफा पतंगी येथून सुंकी येथे निघाला होता. ताफ्यात 18 जवान समाविष्‍ट होते. मार्गात नक्षलवाद्यांनी स्‍फोटके पेरली होती. आयईडीचा वापर करुन स्‍फोट केला. सकाळी 9.30 वाजताच्‍या सुमारास ही घटना घडली. स्‍फोटात ताफ्यातील पहिलेच वाहन उडाले. तीन जवान घटनास्‍थळीच शहीद झाले. त्‍यानंतर नक्षलवाद्यांनी ताफ्यावर गोळीबार सुरु केला. अखेरचे वृत्त येईपर्यंत चकमक सुरुच होती. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त ताफा तत्‍काळ पाठविण्‍यात आला आहे. कोरापूट हे भुवनेश्‍वरपासून जवळपास 363 किलोमीटर अंतरावर आहे. स्फोटात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.