आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडू : CISF जवानाने सहका-यांवर केलेल्या गोळीबारात तीन जवान ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र संग्रहित)
कलपक्कम - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एखा जवानाने त्याच्याच बराकमध्ये त्याच्या बरोबर तैनात असणा-या सहकारी जवानांवर केलेल्या अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जवान जखमी आहेत. जखमी जवानही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

ही घटना कलपक्कम येती आणुऊर्जा प्रकल्पामधील आहे. त्याचठिकाणी सर्व जवान तैनात होते. आरोपी जवानाने बराकमध्ये सकाळी पाच वाजेच्या सुमारास फायरिंग सुरू केली. जवानाने अशा प्रकारे का गोळीबार केला याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही. कांचीपुरमचे एसपी सी विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जवान विजय प्रताप सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

घटनेला दुजोरा देत सीआयएसएफचे डीजी अरविंद रंजन यांनी सांगितले की, 'घटनेच्या कारणांचा तपास घेतला जात आहे. स्थानिक यूनिटकडे घटनेचा पूर्ण अहवाल मागवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.