आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींना खंडणी न दिल्याने तिघांची निर्घ़ूण हत्या; भररस्त्यात ठेवले शिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची/ गुमला- झारंखडमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस सुरुच आहे. खंडणी न दिल्यामुळे बसिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी ‍तिघांची निर्घूण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऊंचडीह गावातील हीरा सिंह (35) आणि तुलसीदास गोसाई (37) या दोघांचे शिर कलम करण्यात आले असून कोनसटोली येथी फरीदानंद सोरेन (30) यांचे दोन्ही पाय तोडून त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर नक्षलवाद्यांनी कापलेले शिर कोनसटोली मार्गावर भर रस्त्यात ठेवून दहशत निर्मात केली आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे बसिया परिसरात तनाव निर्माण झाला आहे.

बसिया पोलिसांना मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती दिली. पो‍लिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेद झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, चीता नक्षली समुहातील कुख्यात गुन्हेगार पात्रिक टोप्पो याने या तिहेरी हत्याकांडाची जबाबदारी स्विकारली आहे. तिघांना खंडणी मागण्यात आली होती. परंतु त्यांनी खंडणी ‍न‍ दिल्याने त्यांची हत्या केल्याचे पात्रिक टोप्पो यांनी पोलिसांना दूरध्वनिवरून सांगितले आहे.