आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांच्या नवजात मुलाला पेसमेकर; स्ट्रॉबेरीएवढे बाळ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा - तीन दिवसांच्या नवजात बालकाच्या हृदयाला राजस्थानमधील डॉक्टरांनी पेसमेकर लावले. त्याच्या हृदयाचे ठोके कमी असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
झालावाड येथील बाळाची ही हकिगत. त्याचा जन्म 15 डिसेंबरला झाला. त्याच्यावरील शस्त्रक्रिया बुधवारी कोटा येथे झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एवढ्या मोठ्या नवजात बालकाच्या हृदयाचा आकार स्ट्रॉबेरीएवढा होता. त्याच्या शरीरात तेवढ्याच आकाराचा पेसमेकर बसवण्यात आला. शस्त्रक्रियेच्या अगोदर बाळाच्या हृदयाची गती प्रतिमिनिटाला 30 वेळा अशी होती. सामान्यपणे ठोक्यांची गती 120 ते 150 पर्यंत असावी लागते. पेसमेकर लावल्यानंतर नवजात बालकाचे ठोके सामान्य झाले. राजस्थानातील ही बहुतेक पहिलीच घटना आहे. याअगोदर मुंबईत एक दिवसाच्या मुलास पेसमेकर लावण्यात आले होते.

20 हजारांत एखादे मूल : कोटा हृदय रुग्णालयाचे संचालक डॉ. राकेश जिंदल तसेच डॉ. साकेत गोयल म्हणाले, 20 हजारांमध्ये एखाद्या मुलाच्या हृदयाची गती जन्मत:च अनियमित असते.