आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपूरमध्ये MLA पुत्राच्या भरधाव BMW ने ऑटोला दिली धडक, तीन जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान) - भरधाव वेगात आलेल्या एका बीएमडब्ल्यूने ऑटो रिक्शाला टक्कर दिली. शनिवारी पहाटे झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. बीएमडब्ल्यू अपक्ष आमदार नंदकिशोर महरिया यांचा मुलगा सिद्धार्थ चालवत होता. बीएमडब्ल्यू एवढी वेगात होती की ऑटोला टक्कर मारल्यानंतर पोलिसांच्या व्हॅनला जाऊन धडकला. तीन पोलिसही जखमी आहेत. अपघातानंतर कारमध्ये बसलेले दोनजण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पोलिसांनी पकडले तेव्हा त्यांनी बाचाबाचीही केली. दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

- पोलिसांनी सांगितल्यानुसार, सिद्धार्थ महरिया शुक्रवार-शनिवारच्या रात्री दोन वाजता दरम्यान बीएमडब्ल्यू कारने वेगाने निघाला होता.
- झेव्हियर्स चौकात कारने एका ऑटोला टक्कर मारली. त्यात बसलेले तीन जण ठार झाले. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांच्या व्हॅनला जाऊन धडकली.
- बीएमडब्ल्यू कार एवढ्या वेगात होती, की धडक झाल्यानंतर ऑटो रिक्शा काही फुट उंच उडाला होता.
- त्यानंतर पोलिसांच्या व्हॅनला धडक दिली. त्यात तीन पोलिस जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...