आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई विमानतळावर आढळल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुटकेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 चेन्नई- चेन्नई विमानतळावर शनिवारी तीन बेवारस सुटकेस आढळल्याने खळबळ उडाली. त्यामुळे विमानतळावर काही वेळ दहशत पसरली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांना कार पार्किंगसह विमानतळावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी या बेवारस सुटकेस आढळल्या.

बॉम्बशोधक पथकाने श्वानपथकाच्या साह्याने या सुटकेस ताब्यात घेतल्या. या पार्श्वभूमीवर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली असून तपासणीही वाढवण्यात आली आहे. सुदैवाने या बेवारस सुटकेसमध्ये स्फोटके किंवा तत्सम काही सापडले नाही. 
बातम्या आणखी आहेत...