आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Four Roti Eat, Congress Once Again Bring In Power; Rahul New Motto

‘तीन- चार रोटी खायेंगे, काँग्रेस को फिर लेकर आयेंगे’; राहुल गांधींचा नारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानात निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करतानाच पक्षाला नवा नाराही दिला. ‘आधी रोटी खायेंगे, काँग्रेस को लायेंगे’ हा नारा आता बरा नाही, असे सांगून ते म्हणाले, नवा नारा असेल, ‘तीन- चार रोटी खायेंगे, काँग्रेस को फिर लेकर आयेंगे’. तुमच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता व्हावी म्हणून माझी स्वप्ने दूर ठेवतो, असे ते म्हणाले.

उदयपूरच्या सलुंबर येथे बुधवारी शेतकरी मेळाव्यात राहुल बोलत होते. केंद्राने अलीकडेच आणलेल्या अन्नसुरक्षा कायद्याचा संदर्भ देतानाच इतर योजनांचा त्यांनी उल्लेख केला. योजना घोषणांच्या रूपात सांगताना ते म्हणाले, ‘अब पुरी रोटी खायेंगे, सौ दिन काम करेंगे, फ्री दवाइयां लेंगे और तब काँग्रेस को दोबारा लायेंगे’. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, त्यांना गरीब ओझे वाटतात. आम्ही मात्र त्यांना ताकद समजतो.