आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी एन्काऊंटर करण्याआधीच 2 गँगस्टरने केली आत्महत्या, एका साथीदारावर झाडली गोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा/डबवाली - हरियाणीतील एका गावात फार्महाऊसवर लपून बसलेल्या तीन गँगस्टरला पोलिसांनी पकडण्यापूर्वीच त्यातील दोघांनी स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली. तर एकाने तिसऱ्या साथीदारावर गोळी झाडली. त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. 
 
तिघेही एका गच्चीवर झोपले होते
- पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पंजाबमधील बंटी गॅंगचे बंटी उर्फ कमल, निसान आणि जिम्मी उर्फ गोंगा हे सोमवारी रात्री जंडवाला बिश्नोई जवळ एका फार्म हाऊसमध्ये थांबले होते. येथे राहणारे आई व मुलगा त्यांचे दुरचे नातलग होते. तिघेही गच्चीवर झोपले होते. 
- फरीदकोट पोलिसांना हे तिन्ही गुंड येथे असल्याची माहिती मिळाली. पंजाब पोलिसांनी हरियाणा पोलिसांशी संपर्क केला. साडेचारच्या सुमारास त्यांनी घराला वेढा दिला. गुंडांना याची माहिती मिळताच त्यांनी गोळीबार सुरु केला. पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला.
- गुंडांनी जवळपास 15 राउंड फायर केले. पोलिसांनी तीन राउंड फायर केले 
- अचानक गुंडांनी फायरिंग थांबवली. फायरिंग थांबताच पोलिस फार्म हाऊसमध्ये दाखल झाले, तेव्हा तिथे दोन गँगस्टरचे मृतदेह पडलेले होते. तिसरा गँगस्टर जखमी अवस्थेत होता. पोलिसांनी त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...