आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे चांगले नाही म्हणून रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारला, Online लिलावात टाकले बायकोचे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलाशीने ड्रायव्हरसोबत घडलेला प्रसंग फेसबुकवर शेअर केला. - Divya Marathi
दिलाशीने ड्रायव्हरसोबत घडलेला प्रसंग फेसबुकवर शेअर केला.
कोलकाता - पेहराव, वेडेपणा आणि आवड यासंबंधीची तीन जगावेगळी प्रकरणे समोर आली आहे. कोलकात्यातील एका यूरोपियन रेस्तराँमध्ये टॅक्सी ड्रायव्हरचे कपडे खराब असल्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. बंगळुरुमध्ये एका मुलीने तिच्या भावी पतीला तिचा डॉगी आवडला नाही म्हणून लग्न मोडले, तर, लंडनमध्ये एका ऑनलाइन लिलावात एकाने आपल्या पत्नीचे नाव नोंदवले.
देशभ्रमंतीवर आलेल्या पर्यटक महिलेने खुश होऊन टॅक्सी ड्रायव्हरला दिली होती ट्रीट...
- ज्या कोलकात्यात राहून मदर तेरेसांनी गरीबांची सेवा केली आणि त्यामुळे त्यांना संत पद मिळाले, त्याच कोलकात्यात एका टॅक्सी ड्रायव्हरला फक्त त्याचे कपडे चांगले नाही म्हणून रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.
- दिलाशी हेमनानी नावाची एक महिला कोलकाता दर्शनासाठी आली होती. यादरम्यान तिची भेट मनीष नावाच्या ड्रायव्हरसोबत झाली.
- मनीष यांनी दिलाशी यांना दिवसभर आपल्या टॅक्सीमधून फिरवले. मनीष यांचे सौजन्य आणि त्यांची वागणूक पाहून दिलाशी खूश झाल्या. त्यांनी मनीष यांना ट्रीट देण्याचा विचार केला व त्यांच्यासोबत पार्क स्ट्रीट येथील मोकाम्बो या यूरोपियन रेस्तराँमध्ये गेल्या. तिथे दिलाशी यांना मनीषसोबत आत येण्यापासून रोखण्यात आले. त्याचे कारण दिले की मनीष यांचे कपडे चांगले नाहीत.
- रेस्तराँ प्रशासनाने ड्रायव्हरवर दारू प्यालेला असल्याचाही आरोप केला. मात्र दिलाशी यांनी तो खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ही संपूर्ण घटना फेसबुकवर शेअर केली. त्यानंतर स्थानिकांनी या रेस्तराँवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
> ऑनलाइन लिलावात टाकले बायकोचे नाव
> भावी पती-पत्नीचा व्हॉट्स अॅपवरील संवाद...
बातम्या आणखी आहेत...