आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Killed In Rohtak As Jat Quota Agitation Turns Violent

हरियाणा पेटले: झज्जरमध्‍ये आर्मीच्‍या फायरिंगमध्‍ये 2 ठार, 13 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक/ पानिपत - हरियाणामध्ये आरक्षणाच्या मागणीवरून जाट समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाने आता हिंसक रूप धारण केले. सोनीपतमध्ये संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे. जाळपोळचे लोण आता थेट दिल्लीच्या दाराशी पोहोचले आहे. दिल्लीला लागून असलेल्या गुडगावमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शनिवारी सकाळी लष्कराला प्राचारण करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, शनिवारी झज्जरमध्‍ये आर्मीने केलेल्‍या फायरिंगमध्‍ये 2 ठार तर 13 जखमी झाले. यापूर्वी शुक्रवारी तिघांचा मृत्‍यू झाला होता.

संतप्त आंदोलकांनी जींद जिल्ह्यातील बुढाखेडा रेल्वे स्टेशनला आग लावली आहे. राज्यातील 21 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये जाळपोळ सुरु आहे. कॅथलचे भाजपचे खासदार राजकुमार सैनी यांच्या घरावरही आंदोलकांनी हल्ला केला आहे.

दुसरीकडे, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला सुषमा जेटली, अरूण जेटली, मनोहर पर्रिकर हे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. आंदोलन रोखण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे सुद्धा या बैठकीला हजर होते.
PHOTOS : हरियाणामध्‍ये काय आहे परिस्‍थ‍िती, कशी भडकली हिंसा

जाणून घ्या LIVE UPDATES....
> मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांना मीडिएटर (समन्वयक) म्हणून हरियाणात पाठवण्याची तयारी सरकारने केली आहे. आंदोलन रोखण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सिंह हे सरकार व जाट नेत्यांमध्ये मध्यस्थीची भूकिमा पार पाडणार आहे.
> सोनीपतमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे.
> हरियाणातून सुटणाऱ्या 500 रेल्वे गाड्या रद्द करण्‍यात आल्या आहेत.
> रोहतकसह अनेक जिल्ह्यातील अनेक शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे.
> दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी राज्यातील एकूण परिस्थितीवर चर्चा केली.
> सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाट नेत्यांच्या मागण्यांसंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे.
> हरियाणाचे भाजपचे नेते संजीव बालियान, ओपी धनखड, चौधरी वीरेन्द्र सिंह, रामलाल व अनिल जैन यांच्यासोबत सरकारने चर्चा केली आहे.
> हरियाणाचे पोलिस महासंचालक वाय.पी. सिंघल यांनी राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली आहे. अनेक मार्ग खुले करण्‍यात आले आहे.
> भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी याविषयावर चर्चा केली आहे. जाट नेत्याशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
> केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात एक बैठक बोलवण्यात आली होती. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर व गृहराज्य मंत्री किरण रिजिजू बैठकीला उपस्थित होते.
> हिसार कॅन्टमधील लष्कराच्या जवानांना रोहतकमध्ये दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
>हिसार- रोहतक महामार्ग आंदोलकांनी ठिकठिकाणी जेसीबी मशीनने खोदला आहे. परिणामी जवान हेलिकॉप्टरने रोहतकमध्ये दाखल झाले आहे.
> दिल्लीच्या काही बटालियन्सला रोहतकला पाठवण्यात आले आहे.
> जाट आंदोलनाचे पडसाद राज्यातील आठ जिल्ह्यात पोहोचले आहे. सगळ्यात जास्त तणाव रोहतक जिल्ह्यात आहे. रोहतकमध्ये शुक्रवारी अनेक दुकानांसह वाहने जाळण्यत आली.
> आंदोलकांनी रोहतक शहरातील एक एटीएम फोडले. मशीनची तोडफोन केली. टायर शोरूम पेटवून दिले. शू शॉप व मोबाइल शॉफी फोडली. फर्निचरची नासधूस केली.
> रोहतक, भिवानी, जींद, कॅथल, सोनीपत, झज्जर, हिसार व पानीपत जिल्ह्यात प्रचंड तणाव असून लष्कराला पाचारण करण्‍यात आले आहे.
> सोनीपतमध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला आहे. दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली आहे.
> आंदोलकांनी शनिवारी सकाळी जींद जिल्ह्यातील बुढाखेडा रेल्वे स्टेशनला आग लावली.
> झज्जरमध्याे गट विकास अधिकारी कार्यालय (बीडीओ) व जिल्हाधिकारी कार्यालयाला आग लावली.
> आंदोलकांनी लष्करी जवानांचा रोखण्यासाठी रास्ता रोको केला. लष्कराचे जवान हेलिकॉप्टरने हरियाणात पोहोचले आहेत.
> केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हरियाणातील लोकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
>रोहतकमध्ये जाट अांदोलन आता चांगलेच चिघळले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
>न्यूज एजन्सी एएनआयनुसार, आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे जवानांना हेलिकॉप्टर्सने रोहतक पोलिस लाइन्समध्ये उतरवण्यात आले.

राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ...
जाट आंदोलनाचे लोण आता संपूर्ण राज्यात पसरले आहे. रोहतकसह भिवानीमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. रोहतकमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. पोलिसांसह 60 हून अधिक जण जखमी झाले.

राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यु यांच्या घरावर हल्ला केला. त्याच्या घरात जाळपोळ केली. अनेक वाहने पेटवून दिली. या पार्श्वभूमीवर भिवानी व रोहतकमध्ये संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे.

गोळीबारात तीन ठार...
पोलिसांच्या गोळीबाारात तीन जण ठार झाले आहे. आंदोलकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहे. दगडफेक व जाळपोळीच्या घटनेत 60 जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकचा ताबा घेतल्याने 550 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्‍यात आल्या आहे.

दुसरीकडे भिवानीमध्ये अजय चौटाला पेट्रोल पंप आणि जाट धर्मशाळेला आग लावण्यात आली. जिंद, हिसार, पानिपत, सोनिपत, कॅथल, झज्जर, रोहतक आणि भिवानीमध्ये लष्कर तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंदोलन प्रभावित जिल्ह्यांत मोबाइल, इंटरनेट सेवा, शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत. आज (20 फेब्रुवारी) होणारी एच-टेट परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

रोहतकमध्ये संतप्त आंदोलकांनी हरियाणाचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू सिंह यांचे घर, भाजप आमदार मनीष ग्रोव्हर आणि आयजी निवासस्थानात घुसून आग लावली. तर दिल्ली रस्त्यावर 100 हून अधिक वाहने, टोल प्लाझा आणि झज्जरमध्ये डिघल टोल, पोलिस चौकी, रोडवेज बस स्टँडवर तीन बसेस व एक मल्टिप्लेक्स जाळून टाकले. रात्री उशिरापर्यंत येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये थांबून थांबून गोळीबार सुरू होता. सोनिपतमध्ये दिल्ली-चंदीगड मार्गावर आंदोलकांनी लोहमार्ग उखडून टाकला. हिसारमध्ये टोलप्लाझावर तोडफोड, जाळपोळ केली. कॅथलमध्ये दोन किलोमीटर महामार्गावर 1500 हून अधिक झाडे तोडण्यात आली. 2000 हून अधिक रोडवेज बसेस आणि दिल्ली, राजस्थान, पंजाब व जम्मूकडे जाणाऱ्या 550 हून अधिक रेल्वे रोखून धरल्या आहेत. पानिपतहून शताब्दी एक्स्प्रेस चंदीगडला परत पाठवण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने सरकारला 23 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील स्थितीवर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

रियाणा सरकारने अखेर गुडघे टेकले
केंद्रीय मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह, अर्थमंत्री कॅ. अभिमन्यू यांच्या प्रक्षोभक विधानांवर तीव्र रोष व्यक्त झाला. मुख्यमंत्री खट्टर यांनी ही विधाने मागे घेऊ आणि जाटांना आरक्षणाचे सर्व लाभ देऊ, असे जाहीर केले.

पुढील स्लाइडवर वाचा..
> 10 टक्के आरक्षण देण्याची तयारी
> हिंसक वळण लागण्याचे मूळ कारण
> गुजरात : हार्दिकचे तुरुंगात उपोषण
> धुमसणार्‍या हरियाणाचे फोटो...