आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जणू धनुर्विद्येसाठीच सराेगसीतून जन्मली शिवानी; 5 व्या वर्षी जिंकली तीन पदके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयवाडा- ही अाहे विजयवाडा येथील चेरीकुरी डाॅली शिवानी. ती केवळ पाच वर्षे सहा महिन्यांचीच अाहे; परंतु धनुर्विद्येत तिने केलेली कामगिरी पाहून तुम्ही चकित व्हाल. शिवानी ४ व ५ डिसेंबरला बँकाॅकमध्ये हाेणाऱ्या ‘अार्चरी यूएफ कप’ स्पर्धेत सहभागी हाेणार अाहे. खरे तर ही स्पर्धा ९ ते १३ वयाेगटासाठीच अाहे; परंतु शिवानीचे कष्ट व प्रतिभा पाहून तिला या स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी विशेष परवानगी देण्यात अाली अाहे.

शिवानी व तिच्या कुटुंबाची कथा यादृष्टीनेही विशेष अाहे की, तिचा जन्मच जणू काही तिरंदाज बनण्यासाठी झालाय. शिवानीचा भाऊ चेरीकुरी लेनिनचा वयाच्या २६ व्या वर्षी २०१० मधील काॅमनवेल्थ गेम्सनंतर एका रस्ता अपघातात मृत्यू झाला हाेता. ताे भारतीय धनुर्विद्या संघाचा प्रशिक्षक हाेता. तसेच त्याची बहीण वाेल्गाचा त्यापूर्वीच २००४ मध्ये मृत्यू झाला हाेता. वडील चेरीकुरी सत्यनारायण यांच्यासाठी तर हा एक माेठा अाघातच हाेता. ते विजयवाडात वाेल्गा अार्चरी अकॅडमी चालवतात. अापल्या कुटंुबातील एका व्यक्तीने तरी तिरंदाजीची परंपरा पुढे न्यावी, अशी त्यांची इच्छा हाेती; परंतु कुटंुबात अाता ते व त्यांची पत्नी कृष्णाकुमारी यांच्याशिवाय अन्य काेणीही नव्हते. दरम्यानच्या काळात ते मुलाच्या सन्मानार्थ अायाेजित एका कार्यक्रमास गेले हाेते. तेथेच त्यांनी सराेगसीच्या माध्यमातून कुटुंब वाढवण्याचा माेठा निर्णय घेतला. तसेच जन्मलेल्या मुलास वा मुलीस तिरंदाज बनवण्याचेही ठरवले. त्यामुळेच शिवानीच्या नसानसात धनुर्विद्या ठासून भरलेली अाहे. धनुर्विद्याच तिच्यासाठी सर्व काही अाहे. केवळ साडेपाच वर्षांतच ती एखाद्या पारंगत खेळाडूसारखी वावरते. धनुर्विद्या शिकताना वा खेळताना ती नेहमी युनिफाॅर्ममध्ये असते व धनुर्विद्येचे अापले सर्व साहित्य काेणाच्याही मदतीविना उचलते अन् सांभाळते. १० वर्षांची झाल्यानंतर तिला भारतीय संघात स्थान मिळावे, असे तिचे प्रशिक्षक चंद्रशेखर यांना वाटते. तथापि, २०१४ च्या अाॅलिम्पिकसाठी शिवानीला तयार करण्याचे तिचे वडील व प्रशिक्षकाचे लक्ष्य अाहे. ताेपर्यंत ती १३ वर्षांची हाेईल.

मागील महिन्यातच शिवानीचे नाव एशिया बुक अाॅफ रेकाॅर्ड व इंडिया बुक अाॅफ रेकाॅर्डमध्ये नाेंदवले गेले अाहे. केवळ ११ मिनिटे व १९ सेकंदांत तिने १०३ तीर मारले, तेही १० मीटर अंतरावरून. एवढेच नव्हे, तर २० मीटर अंतरावरून ५ मिनिटे व ८ सेकंदांत ३६ तीर साेडले. यात शिवानीने ३६० मधून २९० गुण मिळवले. असा विक्रम शिवानीने प्रथमच केला असे नाही. हा विक्रम केल्यानंतर तिला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. तिच्या नावावर ३ इंडिया बुक रेकाॅर्ड, ३ एशिया बुक रेकाॅर्ड व ३ राष्ट्रीय असे नऊ विक्रम अाहेत. शिवानीची अशी कामगिरी करण्याची परंपरा फार पूर्वीपासूनच अाहे. ज्या वयात मुले नीट बाेलू शकत नाहीत, त्या वयात शिवानीने अांध्र प्रदेशात अायाेजित धनुर्विद्या स्पर्धेत ३८८ गुण मिळवून नवा राष्ट्रीय विक्रम नावे केला हाेता.  
बातम्या आणखी आहेत...