आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Militants Including Two Nscnk Insurgents Arrested In Manipur

लष्करावर हल्ला करणाऱ्या अतिरेकी संघटनेच्या 'चेअरमन' सहित 3 जणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ - मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात 4 जूनला लष्कराच्या ताफ्यावर घातक हल्ला करून 18 जवानांची हत्या करणाऱ्या अतिरेकी संघटना एनएससीएन (खापलांग) NSCN(K)च्या दोन सदस्यांसहित एकूण तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये संघटनेचा अमामचाट भागातील स्वयंघोषित 'चेअरमन' खुमलो अबी अनल याचाही समावेश आहे. इम्फाळच्या वेस्ट डिस्ट्रिक्ट पोलिसांच्या कमांडोंनी एका सुपर मार्केटमध्ये केलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान यांना 11 जून रोजी अटक केली आहे.

मणिपूर पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. हा स्वयंघोषित चेअरमन चंदेल जिल्ह्यातील लंबुग गावातील रहिवाशी आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दुसऱ्या NSCN(K) सदस्याचे नाव पम्मी ककीलॉंग उर्फ कलिंग आहे. हा तमेंग्लॉंग जिल्ह्यातील रहिवाशी आहे. या व्यतिरिक्त इम्फाळ इस्ट पोलिस कमांडो आणि 40 आसाम रायफल्स तुकडीने इम्फाळ इस्ट डिस्ट्रिक्टमध्ये 10 जूनला कलेल्या कारवाईत बंद झालेल्या KCP-MC संघटनेचा सदस्य मोहम्मद जाहिद अली याला अटक केले आहे.