आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन महिन्यांच्या मुलाचे शरीर आपोआप पेटते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तीन महिन्यांच्या राहुलचे शरीर अचानक आगीच्या ज्वाळांनी वेढले जाते. त्यात तो भाजलाही जातो. जन्मजात दुर्धर आजारामुळे त्याला या समस्येशी सामना करावा लागत आहे. राहुल नऊ दिवसांचा असताना त्याच्या या आजाराचे निदान झाले. आतापर्यंत त्याचे शरीर चारवेळा आगीच्या ज्वाळात सापडले.

चेन्नईच्या किल्पॉक मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये राहुलला गंभीर जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले आहे. राहुल स्पॉन्टेनियस ह्यूमन कंबशन(एसएचसी) डिसआर्डरने ग्रस्त आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. राहुलचे शरीर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आहे. दोन आठवडाभरापूर्वी राहुलच्या शरीराने आपोआप पेट घेतला होता. त्याच्या आईने राहुलला रुग्णालयात दाखल केले होते.तीन दिवसांपूर्वी त्याला सुटी देण्यात आली.