आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांची टि्वंकल रांगते, जिलेबीही खाते!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर (झारखंड) - तीन महिन्यांची चिमुकली गुडघ्यांवर रांगते, दात नसतानाही जिलेबी खाते, भाकरी-भात खाते, असे सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. जमशेदपूर येथील डॉक्टर सध्या एका चिमुकलीच्या ‘बाललीला’ पाहून असेच चकित झाले आहेत. जमशेदपूर जिल्ह्यातील परसुडीह येथील राकेश पांडेय व सुमित्रा पांडेय यांची मुलगी टि्वंकल (सृष्टी) केवळ तीन महिन्यांची आहे. ती चक्क घरभर रांगते. दात नसतानाही मोठ्या माणसांप्रमाणे जिलेबी खाते. चपाती-भात खाते.

यासंदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. के. के. चौधरी यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे या वयातील मुले आईच्या दुधावरच अवलंबून असतात. ती आता कुठे बाळसे धरायला लागतात. त्यामुळे या वयात गुडघ्यांवर रांगणे, दात नसतानाही पदार्थ खाणे हे चक्रावणारेच आहे. सहा महिन्यांनंतर बाळाला भात-चपाती अन्् तीदेखील बारीक करून देता येऊ शकते. परंतु या टि्वंकलमध्ये दिसत असलेले गुण हे हार्मोन्स बदलामुळे असावेत. मेडिकल सायन्सही हेच सांगते.

मुलीचे वजन आठ किलो
राकेश पांडे लष्करात ज्युनियर इंजिनिअर आहेत. राकेश यांनी सांगितले की, २७ जुलै २०१४ रोजी टि्वंकलचा जन्म जम्मूच्या कमांड रुग्णालयात झाला. सातव्या महिन्यातच तिचा जन्म (प्री मॅच्युअर डिलिव्हरी) झाल्याने तिचे वजन कमी असेल, असे आम्हाला वाटले होते. प्रत्यक्षात जन्मावेळी ती २.४५ किलोची होती. त्यानंतर तिची नियमित वाढ होत असून आज तिचे वजन आठ किलो आहे.