आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार गर्ल्ससोबत नृत्य; तीन पोलिस निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/भोजपूर - बार गर्ल्ससोबत नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी गुरुवारी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यात एका ठाणे प्रमुखाचाही समावेश आहे.
पाटणाचे विभागीय पोलिस महानिरीक्षक नय्यर हसनैन खान यांनी सांगितले की, आम्ही कोईलवार पोलिस ठाण्याचे प्रमुख संजय शंकर, सहायक उपनिरीक्षक देवचंद्र सिंग आणि कॉन्स्टेबल भूषण या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. हे तिघे भोजपूरमधील कोईलवार येथे एका कार्यक्रमात बार गर्ल्ससोबत नृत्य करत असल्याचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला होता. व्हिडिओ फुटेजची पडताळणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पूजा समितीने विजयादशमीनिमित्त कोईलवार चौकात हा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या पोलिस कर्मचाऱ्यांची वर्तणूक योग्य नसल्याने त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
(प्रतिकात्मक फोटो)
बातम्या आणखी आहेत...