आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Three Prisoners Gave Poision In Agra, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनावणीदरम्यान तीन कैद्यांना विष दिले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - आग्रा तुरुंगात शुक्रवारी सुनावणीसाठी आणलेल्या एका आरोपीस आणि त्याच्या दोन मुलांना विष दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या भावाने त्याच्या काकांसह ६ जणांवर हत्येच्या कटाचा आरोप लावला आहे. याप्रकरणी पाच शिपायांना निलंबित करत १२ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जगदीशपुरा येथील दिनेशचंद्र सोनी आणि त्यांचे पुत्र विशाल व योगेंद्र सोनी यांना कौटुंबिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांना शुक्रवारी सुनावणीसाठी आणण्यात आले होते. त्या वेळी दिनेशचंद यांचे बंधू सुरेशचंद आणि रमेशचंद यांनी त्यांना एक पुडी खाण्यासाठी दिली होती, असा आरोप मृताचा मुलगा विशालने केला आहे. ही पुडी खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिघांचाही मृत्यू झाला.